आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशोक लांडे खूनप्रकरणी आरोपनिश्चितीची प्रक्रिया पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शेवगावातील लॉटरी विक्रेता युवक अशोक लांडे खूनप्रकरणी नाशिक येथील जिल्हा सत्र न्यायाधीश कदम यांच्यासमोर गुरुवारी आरोपनिश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली.
या प्रकरणात भानुदास कोतकर, त्याची मुले संदीप, सचिन व अमोल, तसेच चालक अजय गायकवाडसह अन्य अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

13 डिसेंबर 2011 ला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपींनी वेळोवेळी जामीन, दोषारोपपत्रातून वगळण्यासाठी केलेले अर्ज आदी कारणांमुळे आरोपनिश्चितीचे काम दीड वर्ष लांबले. गुरुवारी ही प्रक्रिया पूर्ण झाली. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरुद्ध अशोकची पत्नी व वडिलांना पैसे दिल्याचा आरोप आहे. न्यायालयाने सरकारी वकील माने यांना शनिवारी (5 जुलै) साक्षीदारांची यादी सादर करण्यास सांगितले आहे.