आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Lande Murder Case : Hearing Of Kotkar's Bail On 3o March

अशोक लांडे खूनप्रकरण : कोतकरच्या जामीन अर्जावर 30 मार्चला होणार सुनावणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अशोक लांडे खूनप्रकरणी गेल्या दीड वर्षापासून तुरुंगात असलेला काँग्रेसचा माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकरने जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर 30 मार्चला सुनावणी ठेवण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश ए. एन. करमरकर यांच्यासमोर ही सुनावणी होईल. सरकार पक्षाकडून जामिनाला विरोध करणारे लेखी म्हणणे सादर करण्यात आले आहे.

कोतकरच्या वतीने बुलढाण्याचे वकील निर्मल सावळे यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. अर्जात म्हटले आहे की, हत्याराने मारहाण करून जखमी करणे किंवा अपघातात जखमी झाल्याचे आरोप कोतकरविरूद्ध सिद्ध होऊ शकतात. खोटा पुरावा तयार करून त्यांना गोवण्यात आले आहे. सुरूवातीला या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासही केला. फिर्यादीने उशिरा न्यायालयात धाव घेतल्यानंतर फौजदारी दंड संहितेच्या कलम 156 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याची सुनावणी सुरू होण्यास विलंब होत आहे. पत्नी आजारी असल्याने तिच्यासमवेत राहण्यासाठी जामीन मंजूर करण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे.

जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी जामिनाला तीव्र विरोध करणारे लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले आहे. फिर्यादी शंकर राऊत यांनीही विविध संदर्भ जोडून जामिनाला विरोध करणारे लेखी म्हणणे सादर केले. या अर्जावर 30 मार्चला सुनावणी ठेवण्यात आली असून त्याच दिवशी सरकार पक्षाचा युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. यापूर्वी जिल्हा न्यायालयाने कोतकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेला जामीन अर्ज निकालापूर्वीच मागे घेण्यात आला होता.