आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashok Lande Murder Case Issue Court Hearing On 4 September

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशोक लांडे खूनप्रकरण: दोषनिश्चितीसाठी आता चार सप्टेंबरला सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- एक आरोपी गैरहजर असल्याने लांडे खूनप्रकरणी दोषनिश्चिती लांबली. जिल्हा न्यायाधीश बी. यु. देबडवार यांच्यासमोर याप्रकरणी 4 सप्टेंबरला आता सुनावणी ठेवण्यात आली आहे.

शेवगावचा युवक अशोक लांडे याच्या खूनप्रकरणी दोषनिश्चितीसाठी शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. तथापि, आरोपी भाऊसाहेब उनवणे याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असल्याने तो गैरहजर राहिला. उर्वरित आरोपी न्यायालयात उपस्थित होते. आरोपी सुनील भोंडवेच्या वतीने दोषारोपपत्रातून नाव वगळण्यासाठी करण्यात आलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. माजी महापौर संदीप कोतकरच्या जिल्हाबंदीची अट शिथिल करण्याच्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.