आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भानुदास कोतकरच्या अर्जावरील निर्णय लांबला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अशोक लांडे खूनप्रकरणी आरोपी काँग्रेसचा माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकरच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावरील निर्णय लांबणीवर पडला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. व्ही. नलावडे यांच्यासमोर या अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून बुधवारी निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, निर्णय आता सोमवारी (12 ऑगष्ट) होण्याची शक्यता आहे.

लांडे खूनप्रकरणी भानुदास कोतकरला सप्टेंबर 2011 मध्ये अटक करण्यात आली. तेव्हापासून तो कारागृहात आहे. त्याच्या वतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी दाखल करण्यात आलेले अर्ज फेटाळण्यात आले आहेत. औरंगाबाद खंडपीठात यापूर्वी दाखल करण्यात आलेला अर्ज मागे घेण्यात आला होता. दरम्यान, दोषारोपपत्र दाखल होऊन बराच कालावधी उलटला, तरी दोषनिश्चिती होत नसल्याचे कारण पुढे करुन कोतकरच्या वतीने खंडपीठात जामीन अर्ज करण्यात आला. न्यायमूर्ती नलावडे यांच्यासमोर या अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली. कोतकरपुत्र माजी महापौर संदीप, तसेच सचिन व अमोल सध्या जामिनावर बाहेर आहेत. जामिनासाठी त्यांच्यावर जिल्हाबंदीची अट घालण्यात आली आहे. ही अट रद्द करण्यासाठी कोतकर पुत्रांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अर्जावर न्यायमूर्ती नलावडे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली आहे.