आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोतकरपुत्रांच्या जामिनाचा फैसला लांबला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अशोक लांडे खूनप्रकरणातील आरोपी संदीप, सचिन, अमोल कोतकर व वाहनचालक अजय गायकवाड या चौघांच्या जामीन अर्जावर सर्वाेच्च न्यायालयात होणारी सुनावणी बुधवारी झाली नाही. ती आता गुरुवारी (19 जानेवारी) किंवा मंगळवारी (24 जानेवारी) होईल.
कोतकरपुत्रांसह त्यांच्या चालकाचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वाेच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अल्तमास कबीर व जे. चलोमेश्वर यांच्या पीठापुढे बुधवारी होणारी सुनावणी आता 19 किंवा 24 जानेवारीला होण्याची शक्यता आहे. सरकार पक्षातर्फे लांडे यांच्या मृतदेहाची छायाचित्रे न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहेत.
उनवणेचा जामीन फेटाळला - या प्रकरणातील आरोपी भाऊसाहेब उनवणे यांचा जामीन बुधवारी जिल्हा न्यायाधीश रमेश जोशी यांनी फेटाळला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील विवेक म्हसे यांनी बाजू मांडली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सतीश सुद्रिक यांनी काम पाहिले.