आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप खोटे असल्यास दावा दाखल करा, राधाकृष्ण विखे यांना अशोक विखेंचे आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - सत्ता आणि पैसा डोक्यात घुसला की, बुद्धी भ्रष्ट होते. तेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याबाबत झाले. त्यांची पत्नी शालिनी, पुत्र सुजय यांना सर्व संस्था आपल्याच ताब्यात असाव्यात असे वाटते. माझे त्यांच्याशी तात्त्विक भांडण आहे. मात्र, ते हा वाद कौटुंबिक भासवून मुळा-प्रवरा, प्रवरा शिक्षण संस्था साखर कारखान्याच्या सभासद विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. हे आरोप खोटे असल्यास माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करावा, असे आव्हान त्यांचे सख्खे बंधू डॉ. अशोक विखे यांनी दिले.
 
पत्रकार परिषदेत डॉ. विखे म्हणाले, राधाकृष्ण ताब्यातील संस्थांचा वापर खासगी मालमत्तेप्रमाणे करतात. निवडणुकीत कर्मचाऱ्यांंना वापरतात. दुष्काळग्रस्तांसाठी आलेल्या ५२ कोटींपैकी १७ कोटी वाटता मुळा प्रवरा वीज संस्थेच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांंनी दाबून ठेवले. शासनाने मंजूर केलेली इंधन इतर समायोजन आकारातील सवलतींचे ९१.७० लाख सभासदांची बँकेत खाती नसल्याची बतावणी करून वाटले नसल्याचे डॉ. विखे म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...