आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेसाठी अनेकांची भाजपकडून ‘फिल्डिंग’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लोकसभेनंतर आता नेते विधानसभेच्या तयारीला लागले आहेत, विधानसभा निवडणुकीपर्यंत मोदी लाट ओसरणार नसल्याचा विश्वास महायुतीला आहे. या लाटेवर स्वार होत विधानसभेत पोहोचण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर उमेदवारीसाठी ऐनवेळी पक्षात येणायांना संधी मिळू नये, यासाठी निष्ठावानांनी प्रदेशपातळीवर फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकत मोठी आहे. जिल्हा परिषद तसेच काही नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. मात्र, मोदी लाटेत याचा काडीमात्र फायदा राष्ट्रवादीला झाला नाही. लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीतही होईल, असा विश्वास महायुतीला आहे. त्यामुळे अनेकजण महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यास इच्छुक आहेत. मात्र, नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतरच विधानसभांच्या घडामोडींना वेग येणार आहे.
राष्ट्रवादीचे काही दिग्गज नेते, भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर विधानसभेबरोबरच पक्षाबाहेर पडणायांना थोपवण्याचे आव्हान आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार करून पाठिंबा दिला. याप्रकरणी पक्ष त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. तसेच शेवगाव मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोनिका राजळे भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा व्हॉट्स अप या सोशल साईटस्वर सुरू आहे. श्रीगोंदे मतदारसंघातून भाजपकडून अनेक बडे नेते इच्छुक आहेत. पण काही महिन्यांपूर्वी आमदार शिवाजी कर्डिले यांनी श्रीगोंद्यात जाऊन गाडी फूल होण्यापूर्वीच ज्यांना यायचे त्यांनी भाजपमध्ये या असा सल्ला दिला होता. पण दोन्ही डगरीवर हात ठेवणाया चतूर नेत्यांनी वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली. मोदीच्या लाटेत सुपडा साफ झाल्यानंतर आता हेच नेते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पण ऐनवेळी पक्षात येणायांना उमेदवारीची संधी मिळूू नये, यासाठी भाजपच्या निष्ठावानांनी प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी अनेक स्थानिक नेते विधानसभेसाठी मनसेत जाण्याच्या तयारीत होते. पण मनसेला यश न मिळाल्याने पारनेर व शेवगाव तालुक्यातील नेत्यांची गोची झाली. त्यामुळे हे नेते सध्यातरी काहीही उघड बोलायला तयार नाहीत.
चर्चा करूनच विधानसभेचा निर्णय
भाजपमध्ये कोण प्रवेश करणार यासंदर्भात सुरू असलेल्या प्राथमिक चर्चेला काहीच अर्थ नाही. लोकसभेत मिळालेले मताधिक्य व देशात मिळणाया पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय चर्चा केली जाईल. विधानसभेची उमेदवारी देताना निष्ठावानांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊन चर्चा करूनच उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल.’’ राम शिंदे, आमदार तथासरचिटणीस, भाजप