आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्या जागेसाठी भाजपचा आग्रह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे सध्या पक्षात ‘फिल गुड’ वातावरण आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही पंतप्र्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पक्षाला यश मिळेल. यासाठी भाजपचे पदाधिकारी नगरच्या जागेसाठी आग्रह धरत आहेत.तसा ठराव करून तो प्रदेश पातळीवर पाठवण्यात येणार आहे.
नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार दिलीप गांधी दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. या विजयामुळे मरगळलेल्या भाजपला संजीवनी मिळाली. लोकसभेसाठी भाजपकडून गांधी यांच्याबरोबरच अ‍ॅड. प्रताप ढाकणे, आमदार राम शिंदे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, उमेदवारी मिळवण्यात गांधी यशस्वी झाले. गांधींना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी गांधींच्या उमेदवारीवर आक्षेप घेत बंडाचे निशाण उभारले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ढाकणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. ढाकणे यांनी भाजप सोडल्यामुळे पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपची मते कमी होतील, अशी अपेक्षा होती.
मात्र, या मतदारसंघात मोदी यांच्यामुळे गांधींना मोठे मताधिक्य मिळाले. गांधींच्या विजयामुळे पक्षात पुन्हा एकदा ‘फिल गुड’चे वातावरण निर्माण झाले. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत मोदी यांची लाट होती. विधानसभा निवडणुकीतही मोदी यांची लाट राहील. प्रदेशपातळीवर भाजपने शिवसेनेसमोर 117-171 ऐवजी निम्म्या-निम्म्या जागांचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे. गेल्या 25 वर्षांपासून नगर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे अनिल राठोड विद्यमान आमदार आहेत. मोदी यांची असलेली लाट व फिफ्टी-फिफ्टीचा प्रस्ताव यामुळे नगरच्या जागेसाठी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत. भाजपकडून अनेकांची नावे असली, तरी सक्षम उमेदवार शोधण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे.