आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभेच्‍या सक्षम उमेदवारांसाठी भाजपची होणार तारांबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-लोकसभा निवडणुकीत देशभरात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला घवघवीत यश मिळाले. या मोदी लाटेवर स्वार होण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली असली, तरी प्रमुख विधानसभा मतदारसंघ वगळता अन्यत्र सक्षम उमेदवार शोधण्यासाठी पक्षाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
लोकसभेच्या निकालाने काँग्रेस-राष्ट्रवादीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची सर्वच गणिते बिघडली आहेत. अनेकजण आता भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. काहीजण इतरत्र उमेदवारी न मिळाल्यास भाजपचा विचार करू, असे खुलेआम सांगत आहेत.नगर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मागील 25 वर्षांपासून अनिल राठोड येथे प्रतिनिधीत्व करतात. शिवसेना-भाजप महायुतीत 50-50 टक्के जागावाटपाचा निर्णय झाल्यास भाजप नगरच्या जागेवर दावा करणार आहे. भाजपने दावा केला, तरी सक्षम उमेदवार त्यांच्याकडे नाही. राहुरी मतदारसंघात भाजपकडून पुन्हा शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी मिळेल. कर्जत-जामखेडमधून राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित आहे. हे तीन मतदारसंघ वगळता अन्यत्र भाजपकडे सक्षम उमेदवार नाही. संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात उभा करण्यासाठी भाजपकडे सक्षम उमेदवार नाही. राहाता मतदारसंघात कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात भाजपकडे उमेदवार नसला, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडे अनेक सक्षम उमेदवार आहेत.
पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून विजय औटी यांचे नाव निश्चित आहे. या मतदारसंघात भाजपचे अस्तित्व शून्य आहे. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या विरोधात भाजपकडे उमेदवार नसला, तरी आगामी काळात चित्र बदलण्याची शक्यता आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपकडे अनेक उमेदवार आहे. जिल्हा परिषदेच्या सभापती हर्षदा काकडे, शिवाजी काकडे, दिलीप लांडे, भीमराव फुंदे, अर्जुन शिरसाठ, माजी आमदार दगडू बडे, अशोक गर्जे यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतून येणारेही अनेक आहेत. अकोल्यात राष्ट्रवादीचे मधुकर पिचड यांच्या विरोधात उभा करण्यासाठी भाजपकडे उमेदवार नाही. श्रीरामपूर मतदारसंघात अशीच स्थिती आहे. नेवासे मतदारसंघात मात्र भाजपकडून इच्छुक असलेल्यांची यादी 30 च्या वर आहे.