आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Assembly Elections, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगतापांना उमेदवारी दिली, तरी आघाडी धर्म पाळू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होऊ नये, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण आघाडी होऊन जागांची अदलाबदल झाली व शहर मतदारसंघात संग्राम जगताप अथवा कोणीही उमेदवार असला, तरी मी आघाडीचा धर्म पाळेन, असे उमेदवारीसाठी इच्छुक असलेले जिल्हा परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
तांबे म्हणाले, नगर शहर हा काँग्रेस विचारांचा मतदारसंघ आहे. काँग्रेसला मानणा-या जुन्या वर्गाला बरोबर घेऊन पक्षबांधणी करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी पूर्णपणे नगर शहरात सक्रिय राहणार आहे. मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे. भविष्यात आघाडी होऊन जागांची अदलाबदल होऊ शकते. या जागेवर संग्राम जगताप यांना उमेदवारी मिळाली, तरी त्यांचे काम करून आघाडीचा धर्म पाळू. पण कार्यकर्त्यांना आघाडी व्हावी, असे वाटत नाही. मी कोणाच्याही टीकेला प्रत्युत्तर देणार नाही. भविष्यात काहीही झाले, तरी मी शहराच्या प्रश्नांवर सक्रिय राहणार आहे. नगर हे राज्यातील मध्यवर्ती शहर असून येथे विकासाच्या मोठ्या संधी आहेत. उद्योगासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळही येथे उपलब्ध आहे. शहरात जलशुद्धिकरण प्रकल्प होण्याची, तसेच रस्ते रुंद होण्याची गरज आहे. त्यासाठी पंधरा दिवसांत आवश्यक नियोजन केले जाईल. सरकार कुणाचेही असो, पण शहराला कोट्यवधींचा निधी येतो. मी यापूर्वी चार कोटींचा निधी आणून भिंगारचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. भिंगार येथील रस्त्याखालून जाणारी जलवाहिनी बदलण्यासाठी एमआयडीसी तयार आहे, असे तांबे यांनी सांगितले. नगर शहरात यापूर्वी काँग्रेसचा पराभव हा तांित्रक, तसेच राजकीय अडचणींमुळे झाला होता. विखे व थोरातांमध्ये वाद आहेत, असे मला वाटत नाही. शहरात सर्वांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न असून शहरात कोणतेही गटतट नाहीत, असेही तांबे यांनी सांगितले.
आमदार राठोड यांना पाडण्यासाठी आलो नाही
आमदार अनिल राठोड यांना पाडण्यासाठी किंवा त्यांच्याविरोधात मी नगरला आलेलो नाही. नगर शहरात विकासाच्या अनेक संधी आहेत, म्हणून मला येथे काम करायचे आहे. शहरातील नागरिकांना अपेक्षित नेतृत्व देण्याची माझी क्षमता आहे, असे तांबे यांनी यावेळी सांगितले.