आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रभर घोंगडी बैठका, कार्यकर्त्‍यांवर सोपवली जबाबदारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्यानंतर मंगळवारी रात्रभर घोंगडी बैठका सुरू होत्या. जास्तीत जास्त मतदान घडवण्यासाठी सर्वच उमेदवारांनी जवळच्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
मागील 15 दिवस उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार केला. त्यासाठी आवश्यक त्या तडजोडी करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, उमा भारती आदी दिग्गजांनी जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या. या सभांच्यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करून जनमत आपल्याच पाठीशी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला. सर्व पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने यावेळी कार्यकर्त्यांची दमछाक झाली. स्थानिक कार्यकर्त्यांवर जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रात्रभर वाड्या-वस्त्यांवर बैठका घेऊन आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. पैसेवाटपाचे प्रकार होऊ नयेत, यासाठी कार्यकर्ते एकमेकांवर लक्ष ठेवून असल्याचे चित्र पारनेर, राहुरी, श्रीगोंदे, शेवगाव, नगर आदी मतदारसंघांत पहायला मिळाले.