आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तांबेंच्या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांचे मौन, पुढे येऊन विरोध करण्याची नाही तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच असून उमेदवारही स्थानिक असेल, असा दावा करणा-या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी युवक काँग्रेस उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या भूमिकेवर मौन बाळगले आहे.
शहरासाठी इच्छुक असल्याचे सांगतानाच तांबे यांनी आघाडी होऊन ही जागा राष्ट्रवादीला गेल्यास महापौर संग्राम जगताप यांना सहकार्य करण्याचे बुधवारी (३ सप्टेंबर) जाहीर केले. या वक्तव्यावर प्रतिक्रिया न देण्याची भूमिका संबंधितांनी घेतली आहे. नगरची जागा काँग्रेसकडेच असल्याचे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी छातीठोकपणे सांिगतले होते. तसेच बाहेरचा उमेदवार लादल्यास वेगळा विचार करू, असा इशारा देणारा ठरावही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रदेश समितीकडे यापूर्वीच पाठवला आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत नाशिकला झालेल्या पक्षाच्या विभागीय मेळाव्यातही या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन ठोस भूमिका घेण्याची विनंती केली होती. या मेळाव्यानंतर सारडा यांनी पक काढून मुख्यमंत्र्यानी नगरची जागा काँग्रेसकडेच असल्याचे स्पष्ट केल्याचे सांगितले. पक्षाकडून स्थानिक उमेदवार देण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याची माहिती दिली होती. नगरचीच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जागांची अदलाबदल होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यानी ठणकावून सांगितल्याचेही पकात नमूद केले होते.
या पार्श्वभूमीवर तांबे यांनी नुकतीच पकार परिषद घेऊन शहराच्या जागेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आघाडी झाल्यास जगताप यांना पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी जाहीर करून टाकले. राष्ट्रवादीच्या दाव्यानंतर व प्रयत्नांनंतर तातडीने हालचाली करत ही जागा काँग्रेसचीच असल्याचा दावा करणारे स्थानिक पदाधिकारी तांबे यांच्या दाव्यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. या संदर्भात सारडा यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शवला. "मला काहीही बोलायचे नाही' ही सारडा यांची प्रतिक्रिया तांबे यांच्या उमेदवारीला विरोध मावळल्याचे स्पष्ट करत आहे. सारडा यांच्यासह सहाजणांनी नगरच्या जागेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. तांबे यांनी नगरच्या जागेसाठी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज केलेला नाही. त्यामुळेच काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व इच्छुक निर्धास्त होते. इच्छुक असल्याचे तांबे यांनी दर्शवल्यानंतर या नेत्यांनी सावध भूमिका घेत मौन बाळगणे पसंत केले आहे.
बाहेरचा उमेदवार लादल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा देणारा ठराव करून शहर जिल्हा काँग्रेस समितीने प्रदेश समितीकडे पाठवला आहे. उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज केलेल्या सहापैकी कोणालाही उमेदवारी द्यावी. मा, उपरा उमेदवार लादू नका, असे सारडा यांच्या पकात नमूद करण्यात आले होते. तांबे यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर पुढे येऊन त्यांना विरोध करण्याची यापैकी एकाही इच्छुकाने हिंमत दाखवलेली नाही.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून नगर शहरात विकासकामांचा सपाटा सत्यजित तांबे यांनी सध्या लावला आहे. विविध विकासकामांचा तांबे यांच्या हस्ते प्रारंभ होत असताना उपऱ्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणारे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये तांबे यांनी भूमिपूजनांचा धडाका लावताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना, इतकेच नव्हे, तर महापौर जगताप यांनाही दूरच ठेवले आहे.