आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये दोन अर्ज अवैध; तीन अर्जांवर आज निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर मतदारसंघातील दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरले. अन्य तीन अर्जांवर मंगळवारी (३० सप्टेंबर) निर्णय होणार आहे. छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी वामन कदम यांच्या उपस्थितीत पार पडली.
गोरख खळे (अपक्ष) व अनिल ओहोळ (बसप) यांचे अर्ज अवैध ठरवले. अनिल शेकटकर, अनिल सुधाकर राठोड व अनिल पवार या तीन अपक्षांच्या अर्जांवर हरकत घेतल्याने त्याबाबतचा निर्णय मंगळवारी होईल. 19 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले होते. गोरख खळे यांचे वय कमी दाखवण्यात आल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. अनिल ओहोळ यांनी बसपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, एबी फॉर्म नसल्याने, तसेच अपक्ष उमेदवारासाठी आवश्यक दहा सूचक व अनुमोदक नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. अनिल रामकिसन राठोड (शिवसेना), संग्राम अरुण जगताप (राष्ट्रवादी), अभय जगन्नाथ आगरकर (भाजप), सत्यजित सुधीर तांबे (काँग्रेस), आसाराम हरिभाऊ कावरे (बसप), भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर (जनता युनायटेड), हेमंत यशवंत ढगे, शिवाजी लोंढे, मकरंद कुलकर्णी, आनंदा लहामगे, गणेश नन्नवरे, उबेद शेख व विजय वाघ यांचे अर्ज वैध ठरले आहेत.