आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धास्तावल्याने विरोधकांकडून दिशाभूल- आमदार अनिल राठोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विरोधक धास्तावले आहेत. त्यामुळेच त्यांनी 'अनिल राठोड' नावाचा डमी उमेदवार उभा केला. समोरासमोर लढण्याची विरोधकांमध्ये धमक नसल्याने डमी उमेदवार उभे करून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. विरोधकांनी आता त्यांचे डिपॉझिट वाचवावे, अशी टीका शिवसेनेचे उमेदवार आमदार अनिल राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
राठोड म्हणाले, विरोधकांच्या नामर्दपणामुळे माझा विजय निश्चित आहे. सेना-भाजपची युती तुटल्याने काहीच फरक पडणार नाही. विरोधकांकडे स्वत:चे काही सांगण्यासारखे नाही. गुंड कोण आहे, कोणी जमिनी बळकावल्या, कोणाची दहशत आहे हे नागरिकांना चांगले माहिती आहे. विरोधक खोटी पत्रके वाटून नागरिकांची दिशाभूल करत आहेत. भाजपने जिल्ह्यात अनेक ठिकाणी आयात केलेले उमेदवार दिले आहेत. शहरातील मतदार शिवसेनेला मानणारा आहे. गेल्या 25 वर्षांत एकदाही मी पक्ष बदलला नाही. विरोधात उभे असलेल्या काहींनी मात्र अनेकदा पक्ष बदलला आहे. अशा लोकांवर मतदार विश्वास ठेवणार नाहीत. कारण हे लोक कधी विश्वासघात करतील याचा भरवसा नाही. विरोधक हतबल झाले आहेत. त्यामुळे मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी मी जास्त मतांनी निवडून येईन, असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेस माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक विक्रम राठोड, मनोज दुल्लम आदी उपस्थित होते. दरम्यान, शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश बाठिया यांनी राजीनामा देत शिवसेनेत बिनशर्त प्रवेश केला. पदाधिका-यांची दखल घेतली जात नाही. जो पक्षास वेठीस धरतो, अशा लोकांचीच दखल घेतली जाते. त्यामुळेच काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक व कार्यकर्तेच स्टार प्रचारक
शिवसेनेचे कोणी स्टार प्रचारक नगरमध्ये सभा घ्यायला येणार आहेत का,असे आमदार राठोड यांना विचारले असता, नगरसेवक व कार्यकर्ते हेच माझे स्टार प्रचारक असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची शहरात सभा होणार आहे. डॉ. अमोल कोल्हे व आदेश बांदेकर यांचा दौराही लवकरच निश्चित होईल, असे राठोड नंतर म्हणाले.