आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections,,latest News In Divya Marathi

पक्षांनी स्वबळावरच निवडणूक लढावी, महाविद्यालयीन युवकांनी नोंदवली मते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जागावाटपाच्या मुद्यावरून शिवसेना-भाजप युती तुटली. एकमेकांवर आगपाखड करत सत्ताधारी आघाडीतही काडीमोड झाला. त्यामुळे शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. या परिस्थितीकडे नवमतदार कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, हे "दिव्य मराठी'ने जाणून घेतले. राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवणे हे लोकशाहीला पोषक व पूरकच असल्याचे मत न्यू आर्टस् महािवद्यालयातील काही युवकांनी नोंदवले.
सर्व पक्षांनी युती व आघाडी तोडून वेगवेगळे उभे राहून निवडणूक लढवण्यास सुरुवात केली. त्यातून फक्त एकच साध्य होईल, ते म्हणजे मुख्यमंत्रिपद. यातून जनतेचा व महाराष्ट्राचा कसा काय विकास साध्य होणार, हा प्रश्नच आहे, असे सुमित भांगरे म्हणाले.

पुन्हा साटेलोटे...
सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने कोणाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. भाजप व शिवसेनेला पुन्हा साटेलोटे करावे लागेल.ह्व भानुदास जगताप, राज्यशास्त्र विभागप्रमुख, न्यू आर्टस कॉलेज.
एकत्र लढायला हवे
एकत्र येऊन निवडणूक लढवणे गरजेचे होते. सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी कामे करावीत. विकासच होत नसेल, तर निवडणुकीचा फायदा काय ?
भावना वाळुंजकर, विद्यार्थिनी.