आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"पंचरंगी लढतीत प्रत्येक पक्षाची ताकद समजणार'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- राज्यात सर्व जागांवर एकही पक्ष उमेदवार देऊ शकला नाही. त्यामुळे प्रथमच स्वबळावर होत असलेल्या पंचरंगी लढतीत प्रत्येकाची ताकद समजेल, असे प्रतिपादन कामगार नेते व काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी केले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ सय्यदबाबा चौकात झालेल्या सभेत जगताप बोलत होते. उमेदवार थोरात यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जगताप म्हणाले, पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर गोळीबार करत आहे. देशाचे संरक्षण करणारे जवान धारातिर्थी पडत असतानाच अनेक निरपराधही मारले जात आहेत. पाकिस्तान व चीनची घुसखोरी सुरू असताना देशाच्या पंतप्रधानांना त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असे ते म्हणाले. सत्तेच्या लालसेपोटी पंतप्रधान गल्लोगल्ली मतांचा जोगवा मागत फिरतात. त्यामुळे पंतप्रधानपदाचे अवमूलन झाले आहे, अशी टीका त्यांनी केली. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की भाजपचे असा सवाल करत मतदारांनी केलेली चूक सुधारून काँग्रेसच्या मागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.