आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार, मंजूर शिवारातील घटना, आरोपीला अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोपरगाव - तालुक्यातील मंजूर शिवारात एका अल्पवयीन आदिवासी भिल्ल समाजातील सात वर्षीय मुलीवर त्याच गावातील नराधमाने तुला बहिणीकडे घेऊन जातो, अशी फूस लावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. त्यास १३ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली.
आरोपी शंकर पांडुरंग गायकवाड (२५, कारवाडी मंजूर) याने सात वर्षीय मुलीस तुला तुझ्या बहिणीकडे घेऊन जातो, अशी फूस लावून तिला उसाचे शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीने संध्याकाळी आई-वडिलांना घडलेली घटना सांगितल्यावर त्यांनी पोलिस ठाणे गाठले.

पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी पोलिस हेडकॉन्स्टेबल अशोक कुसाळकर, पोलिस नाईक असिर सय्यद, अशोक कुदळे यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी शंकर पांडुरंग गायकवाड यास ताब्यात घेतले. पीडित मुलीस नगर येथील बालसुधारगृहाकडे रवाना केले आहे. कोपर्डीच्या घटनेनंतरही अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबत नाहीत. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...