आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वकिलाला फौजदारी गुन्ह्यातून वगळण्यास नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पक्षकारालाजातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल खटल्यातून वगळावे, ही अ‍ॅड. निर्मला चौधरी यांची विनंती न्यायालयाने फेटाळली. कौटुंबिक वादासंदर्भातील खटल्यात त्या काम पहात होत्या. खटल्याची कागदपत्रे मागितली असता चौधरी यांनी जातीवाचक शिवीगाळ केली, अशी फिर्याद ज्योती बिडलान यांनी दिली होती. पोलिसांनी चौधरींविरोधात अ‍ॅट्रोसिटी गुन्हा नोंदवला.
आपल्याविरुद्ध योग्य तो पुरावा नसल्याने या खटल्यातून वगळावे, असा अर्ज अ‍ॅड. चौधरींनी सादर केला होता. त्यावर सुनावणी होऊन तो नामंजूर करण्यात आला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सुरेश लगड यांनी बाजू मांडली. द्रूतगती न्यायालयाचे न्यायाधीश ए. डी. तनखीवाले यांनी २१ ऑगस्टला अ‍ॅड. चौधरी यांचा अर्ज नामंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.