आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिवप्रहार’चे भोर यांच्यावर हल्ला, नगरमध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दळवींसह वीस जणांवर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्यावर रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हल्ला झाला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी (सोनेवाडी) यांच्यासह २० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

व्हॉटस््अॅप पोस्टवरून वाद : भोर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सकल मराठा समाज व्हॉट्सअॅप ग्रुपवर दळवी यांनी टाकलेली एक पोस्ट भोर यांना खटकली. भोर यांच्याविषयी यात आक्षेपार्ह मजकूर होता. साडेदहाच्या सुमारास भोर यांनी यावर दळवीना फोन करून जाब विचारला. त्यावर दळवी यांनी भोर यांना जिवे मारण्याची धमकी दिली. एकविरा चौकात बोलावून घेतले.

पाकिट पळवल्याची तक्रार : फिर्यादीनुसार, भोर यांचा मोबाइल हिसकावून घेण्याचा हल्लेखोरांनी प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्यामुळे भोर यांचे पाकिट घेऊन हल्लेखोंरानी पोबारा केला. पाकिटात २२ हजार रुपयांची रोकड होती. याप्रकरणी पोलिसांनी गोरख दळवी यांच्यासह २० जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न, संगनमताने कट रचून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करणे, दरोडा, धमकी देणे अशा कलमान्वये गुन्हा नोंदवला.

दगडाने डोक्यात मारहाण
दळवींनी बोलावल्यावरून भोर एकवीरा चौकात आले तेव्हा दळवी व सहकाऱ्यांनी भोर यांच्यावर हल्ला चढवला. दगडाने डोक्यात मारहाण केली. सोबत असलेले यशवंत तोडमल, संदीप संसारे, संदीप अकोलकर, भूषण पाचेगावकर, अनिल अकोलकर यांनी भांडण सोडवायचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही मारहाण झाली.
बातम्या आणखी आहेत...