आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी पोलिस महासंचालकांवर प्राणघातक हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सेवानिवृत्त अतिरिक्त पोलिस महासंचालक राज प्रेम खिलनानी (वय ६२) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने त्यांनी तो चुकवल्यामुळे प्राण वाचले. खिलनानी यांच्या मालकीचे घर भाड्याने मागण्याच्या कारणावरून हा हल्ला केल्याचे समोर आले. हल्लेखोराने खिलनानी यांना घर भाड्याने दिले नाही, तर जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अरणगाव शिवारात घडला.
सेवानिवृत्त पोलिस महासंचालक खिलनानी हे सध्या पुण्यातील उंदरी येथे केंद्र शासनाच्या आयटीआय महामंडळाचे गव्हर्नर आहेत. अरणगाव- मेहेराबाद येथे त्यांच्या मालकीचे घर आहे. काही दिवसांपासून ते येथे रहायला आले होते. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एक व्यक्ती त्यांच्या घरात घुसली. या व्यक्तीने खिलनानी यांना "तू सेवानिवृत्त झाला आहेस. त्यामुळे मला हे घर भाड्याने दे', असे म्हणून शिवीगाळ करत पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने खिलनानी यांनी तो चुकवल्यामुळे ते वाचले.

नंतरही हल्लेखाेराने खिलनानी यांना "तू मला घर दिले नाही, तर तुला जिवंत सोडणार नाही', असे म्हणून धमकावले. खिलनानी यांनी आरडाओरडा केल्यामुळे हल्लेखोर व्यक्ती निघून गेली.
या घटनेची माहिती समजताच नगर ग्रामीणचे उपअधीक्षक आनंद भोईटे नगर तालुक्याचे सहायक निरीक्षक व्ही. एम. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. खिलनानी यांच्या फिर्यादीवरुन हल्लेखोराविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, अनाधिकाराने घरात घुसणे, शिवीगाळ करुन धमकावणे आदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...