आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुठेवाडगाव येथे माजी सरपंचांच्या घरावर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या असल्या, तरी निकालानंतर मात्र हाणामारीच्या घटना घडल्या. मुठेवाडगाव येथे माजी सरपंचाच्या घरावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुठेवाडगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. भाजपचे तालुकाध्यक्ष बबन मुठे रघुनाथ मुठे यांच्या मंडळाचा पराभव होऊन काँग्रेसचे विश्वनाथ मुठे यांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवार विजयी झाले. सरपंच विमल रघुनाथ मुठे या पराभूत झाल्या. गावात विजयी मंडळाची मिरवणूक निघाली. सभा शांततेत झाली. विश्वनाथ मुठे हे बाजार समितीला उभे असल्याने एका बैठकीसाठी निघून गेले. पण विजयानंतर मच्छिंद्र रामभाऊ मुठे संतोष रामभाऊ मुठे हे गावापासून दोन किलोमीटर असलेल्या रघुनाथ मुठे यांच्या वस्तीवर गेले. तेथे फटाके वाजवून शिवीगाळ केली. त्यामुळे मुठे यांनी त्यांना चोप दिला पकडून ठेवून पोलिसांना कळवले. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे कार्यकर्ते मुठे यांच्या घराकडे आले. त्यांनी मुठे यांच्या घरी दगडफेक केली. यावेळी पोलिसांचा फौजफाटा आलेला होता. बळाचा वापर करून पोलिसांनी हल्ला परतवून लावला.

रघुनाथ मुठे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून मच्छिंद्र मुठे, संतोष मुठे, संतोष साहेबराव मुठे, दीपक साहेबराव मुठे, सागर ज्ञानदेव मुठे, संदीप सुरेश मुठे, ज्ञानेश्वर खंडू मुठे, भाऊसाहेब बाळासाहेब मुठे, रवी दिनकर मुठे, गोरख मोहन पाचपिंड, प्रदीप अशोक मुठे, सोमनाथ अप्पा मुठे, प्रकाश नारायण मुठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.