आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्‍ये अवसायक मंडळाची आज बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बहुचर्चित संपदा पतसंस्थेच्या अवसायक मंडळाची शनिवारी (24 मे) सायंकाळी चार वाजता लालटाकी येथील संस्थेच्या कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत जप्ती मोहिमेचा आढावा व वसुलीला गती देण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली संपदा पतसंस्थेवर अवसायक मंडळ कार्यरत आहे. त्यांच्या उपस्थितीत 6 मे रोजी थकीत कर्जदारांच्या मालमत्ता जप्तीची मोहीम उघडण्यात आली होती. आचारसंहितेचा अडथळा आल्याने ही मोहीम एकाच दिवसात गुंडाळावी लागली. मात्र, सुरुवातच बड्या कर्जदारांपासून केल्याने मोहिमेला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा उंचावल्या.
ठेवीदारांनाही गेल्या साडेतीन वर्षांत प्रथमच सकारात्मक घडत असल्याचे चित्र दिसले. आचारसंहिता आटोपल्यानंतर अवसायक मंडळाने पारनेर तालुक्यात जप्तीची मोहीम राबवली. नगर व पारनेर तालुक्यातील ठेवीदारांच्या ठेवी साडेतीन वर्षांपासून अडकल्या आहेत. ठेवपरतीची आशा सोडलेल्या ठेवीदारांना अवसायक मंडळ कार्यरत झाल्यानंतर किमान मुद्दल तरी परत मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने अवसायक मंडळाने वसुलीचे नियोजनही चालवले आहे. आतापर्यंतच्या जप्ती मोहिमेचा आढावा वसुलीला वेग देण्याबाबत व्यूहरचना या बैठकीत आखण्यात येणार आहे.