आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाविश्व: रसिकांनी अनुभवली सिद्धहस्त कुंचल्यांची करामत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दिवंगत ज्येष्ठ चित्रकार गोपाळ देऊस्कर यांच्या स्मरणार्थ शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन कलाजगतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यक्तिचित्रण (पोट्रेट) स्पर्धेला पहिल्याच वर्षी मोठा प्रतिसाद मिळाला. सुहास बहुळकर, पाडेकर, अकुझा यांच्यासारखे नामवंत चित्रकार या उपक्रमात सहभागी झाले. चित्रकार चित्रपट दिग्दर्शक रामदास फुटाणे यांच्यासह जिल्ह्यातील जुन्या नव्या पिढीतील अनेक नामवंत चित्रकार यानिमित्ताने एकत्र आल्याने टिळ‌क रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जणू चित्रकारांचे संमेलनच भरले होते.

चित्रकार गोपाळ देऊस्कर यांचा जन्म ११ सप्टेंबर १९११ रोजी नगरमध्ये झाला. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चित्रकार प्रमोद कांबळे नरेंद्र फिरोदिया यांच्या पुढाकाराने या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पोट्रेट रंगवली, तर दुसऱ्या दिवशी देशभरातून आलेल्या सिद्धहस्त चित्रकारांनी आपल्या कंुचल्याची करामत दाखवली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पोट्रेट यावेळी रंगवण्यात आले. सुहास बहुळकर रंगकाम करत असताना ते पाहण्यासाठी अन्य चित्रकार रसिकांची मोठी गर्दी झाली होती. समारोपप्रसंगी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांचा कलामहर्षी र. बा. केळकर पुरस्काराने गौरव करण्यात आला.
बहुजनांना अभिजन केले...
बहुजनांना अभिजन करण्याचे महत्त्वाचे कार्य नरेंद्र फिरोदिया प्रमोद कांबळे या माध्यमातून करत आहेत. संपूर्ण भारतातील ही पहिलीच भव्य पोर्ट्रेट स्पर्धा आहे.' रामदास फुटाणे, चित्रकार चित्रपट निर्माते.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पोर्ट्रेट प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांनी रेखाटले. या दोघांसमवेत प्रमोद कांबळे नरेंद्र फिरोदिया. छाया : मंदार साबळे
बातम्या आणखी आहेत...