आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौपदरीकरणाच्या कामास विलंब का? औरंगाबाद खंडपीठाचा सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव- नगर-मनमाड राज्यमार्गाच्या चौपदरीकरणातील उर्वरित कामास विलंब का झाला? अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. चौपदरीकरणाच्या विलंबाबाबत 16 ऑगस्टपर्यंत लेखी स्वरूपात कारणे द्यावीत, असा आदेशही खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
नगर-मनमाड राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर या मार्गावरून जाणारी अवजड वाहतूक पुणतांबा चौफुली येथून चांदेकसारे मार्गे पोहेगाव व संगमनेरकडे वळवण्यात आली. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम येवला तालुक्यापर्यंत झाले. त्यानंतर पुढे राहुरीपर्यंत हे काम झाले मात्र कोपरगाव, कोल्हार व राहाता पर्यंतचे काम मागील अनेक वर्षापासून रखडले आहे. कोपरगाव - संगमनेर रस्ता जड वाहतुकीस योग्य नसतानाही या रस्त्यावर टोल नाका उभारून वाहतूकदारांकडून खुलेआम पैसे उकळले जातात. केवळ टोलमालकाचे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी जड वाहतूक सुरू रहावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम केले नाही. या रस्त्याचे काम रखडल्याने अपघातात 25 निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 5 ऑगस्टला खंडपीठाचे न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती एस. बी.देशमुख यांच्यासमोर सुनावणी झाली.सुनावणीत नगर-मनमाड रस्त्याच्या चौपदरीकरणास विलंब का झाला अशी विचारणा न्यायमूर्ती पाटील व देशमुख यांच्या खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एम.जी. शेख यांना केली. नगर-मनमाड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम का रखडले याबाबत येत्या 16 ऑगस्टला कारणे दाखवण्याचे आदेश खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.