आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabadite Daud Parents With Son Died In Accident In Nagar District

औरंगाबादेतील दौड दांपत्यासह मुलाचा नगरजवळ अपघाती मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर/नेवासा/औरंगाबाद - भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. के. वाय. दौड यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. त्यांचा आणखी एक मुलगा, मुलगी जखमी आहेत. नेवासा तालुक्यात वाघवाडी-लोहगाव शिवारात शनिवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली.
गारखेडा भागातील विजयनगरात राहणारे डॉ. दौड (67), त्यांच्या पत्नी सरस्वती (60) व गाडी चालवत असलेला मुलगा सूरज याचा यात मृत्यू झाला. दुसरा मुलगा सुशील व मुलगी सपना जखमी झाले. नगरहून त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सपनाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ह्युंदाई कारने (एमएच 20 सीएस 990) हे कुटुंबीय पुण्याहून औरंगाबादला परतत होते. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळून उलटली. शवविच्छेदनानंतर रविवारी दुपारी तिघांवर सिल्लोड तालुक्यात पानवडोद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुभाष मानकर यांच्या फिर्यादीवरून चालक सूरज दौडविरुद्ध सोनई पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मुलीच्या हॉस्पिटलचे उद्घाटन
डॉ. दौड यांची थोरली मुलगी पुण्यात असते. वाघोलीतील तिच्या हॉस्पिटलचे उद्घाटन असल्याने हे कुटुंबीय शनिवारी सकाळी स्वत:च्या कारने गेले होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी ही कार घेतली होती. दौड यांचा मुलगा सूरज गाडी चालवत होता. त्याचाही यात मृत्यू झाला. छत्रपती शाहू महाराज तंत्रनिकेतन महाविद्यालयात सूरज तृतीय वर्षाला होता.