आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरी बुद्धीत्मत्ता ग्रामीण भागातच - राजीव खांडेकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - शहरी मुलांची वाढच मुळी झापडबंद पद्धतीने होते. त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व तुलनेने ‘संकुचित’ राहते. इंटरनेटची कनेक्टीव्हिटी, रिलेशनशीप असे शहरी मुलांचे प्रश्नच पूर्णतः वेगळे आहेत. ग्रामीण मुलांचे व्यक्तिमत्त्व शहरी मुलांच्या तुलनेत कित्येक पट अधिक समृद्ध असते. अनेक गोष्टी माहिती असलेल्या ग्रामीण मुलांचे भावविश्व हेच त्यांचे सामर्थ्य असते. ग्रामीण मुलांची झापडं गळून पडलेली असतात. प्रत्येकाने आपले एक स्वप्न पाहा. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. चांगले माणूस बना, असा सल्ला पत्रकार राजीव खांडेकर यांनी दिला.
अकोले येथील दिशा फाऊंडेशन आणि अॅक्टीव टीचर्स फोरम, महाराष्ट्र यांच्या वतीने शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 'दिशा- २०१६' या करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या निमित्त एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी संगणक संशोधक गिरीश लाड, उद्योजक गणपतराव महाले, एक्सेल गॅस मुंबई या कंपनीचे संचालक नितीन गोडसे यांनी विद्यार्थी आणि पालकांशी हितगुज केले. विद्यार्थ्यांनीही त्यांना अनेक प्रश्न विचारले. श्रद्धा घुले, प्रियांका पांडे, सीए कमलकिशोर राठी, वैद्यकीय संशोधक डॉ. प्रसाद भाटे, सीताराम लकडे या विविध क्षेत्रातील पाच तरुणांचा ‘यंग अचीवर्स २०१६' ने सन्मान केला.