आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कवितेमागचे वास्तव समजून घेता यायला हवे : फ. मुं. शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आपल्याकडे कोणत्याही गोष्टीला विनोदाच्या अंगाने बघत सोडून देण्याची प्रथा आहे. गांभीर्याची गंगोत्री गमतीतूनच होत असते. त्यामुळे कविता आणि विनोद नेमका कोठून पाझरतो यामागचे वास्तव नेमकेपणाने समजून घेता यायला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांनी रविवारी केले.

कवयित्री संजीवनी खोजे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने तुषार गार्डनमध्ये आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रा. डॉ. चं. वि. जोशी यांच्या ‘लालबत्ती आणि इतर कविता’ या संग्रहाला कवयित्री संजीवनी खोजे पुरस्कार त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख 5 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी प्रसिद्ध कवी रामदास फुटाणे, डॉ. गोपाळराव मिरीकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत मुथा उपस्थित होते. प्रास्ताविक सदानंद भणगे यांनी केले. अमोल बागूल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

फ. मुं. शिंदे म्हणाले, काही जण तासन्तास बोलत राहतात, पण त्यांना काहीच सांगायचे नसते. याउलट एखाद्याला तासन्तास विनवणी करूनही ते काहीच बोलत नाहीत. पण नेमक्या शब्दांत बरेच काही सांगून जातात. असे नेमके सांगणारे कवीच असतात. पण तसे सांगण्यासाठी आतल्या ऊर्मीने लिहायला हवे. सोसण्या-भोगण्यातून जे लिहितात तेसुद्धा कवीच असतात. काही कवींना विद्रोही समजले जाते, पण विद्रोह म्हणजे प्रत्येकाच्या संवेदनशीलतेला आवाहन करणारी खंत आहे, असे शिंदे या वेळी म्हणाले.

प्रा. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. कवी चंद्रकांत पालवे यांनी जोशी यांचा परिचय करून दिला. कवितासंग्रहांचे परीक्षण डॉ. मिरीकर व प्रदीप हलसगीकर यांनी केले. डॉ. मिरीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला कवी लहू कानडे, संजय कळमकर, डी. एम. कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.