आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांचे क्रिकेटप्रेम जगावेगळे- शिरीष कणेकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भारतात अभिनेते व क्रिकेटपटूंना देव समजले जाते. मात्र, इतर देशांत अशी परिस्थिती नाही. भारताचे क्रिकेटप्रेम जगावेगळे आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक शिरीष कणेकर म्हणाले.

जिल्हा क्रिकेट असोसिएशन व क्रॉम्प्टन ग्रीव्हजच्या वतीने वाडिया पार्कवर आयोजित 27 व्या क्रॉम्प्टन क्रिकेट करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवारी कणेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यंदाचा करंडक हुंडेकरी अँकॅडमीने पटकावला. असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अरूण जगताप, महापौर शीला शिंदे, माजी महापौर संग्राम जगताप, क्रॉम्प्टनचे महाव्यवस्थापक विजय लेले, संजय बोरा, अशोक बाबर, जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले आदी यावेळी उपस्थित होते.

कणेकर म्हणाले, भारतीय क्रिकेट सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. सहा दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यामुळे संघ कमकुवत होणारच. पैशांच्या मागे क्रिकेटपटू लागल्यामुळे मैदानावर ते आपले खेळ दाखवू शकत नाहीत, अशी टीका केली जाते. पण त्यात काहीही तथ्य नाही. आयपीएलमध्ये एखाद्या क्रिकेटपटूची निवड झाली, तर त्याच्या काही पिढय़ांना पुरेल इतका पैसा मिळतो. निवड समितीकडे कुठलेही ध्येयधोरण नाही, तसेच समिती धोरणात बदल करत नाही. निवड समितीत खेळाडूंचा समावेश असतो. मात्र, समितीत दाखल झाल्यानंतर तो निवड समितीचीच भाषा बोलतो. क्रिकेट हा खेळ आहे. त्यात हरणे म्हणजे फार मोठा गुन्हा आहे असे नाही. ट्वेंटी-20 मुळे कसोटी क्रिकेटला फायदाच झाला आहे, असे कणेकर यांनी सांगितले.

अंतिम सामन्यात हुंडेकरीने द इलेव्हन संघाचा 29 धावांनी पराभव केला. हुंडेकरीच्या प्रदीप जगदाळे याने सर्वाधिक 66 धावा केल्या. ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार प्रदीप जगदाळे याला मिळाला.