आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Auto Union Leader Sharad Rao Dismiss Demand Agar

शरद राव यांना त्वरित निलंबित करा;ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना कृती समितीचा ठराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत समितीचे कार्याध्यक्ष शरद राव यांना निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी अंतिम निर्णय घ्यावा, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे. प्रलंबित मागण्यांसाठी 18 जुलै रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

हमाल पंचायत कार्यालयात समितीच्या राज्य पदाधिकार्‍यांची बैठक रविवारी जिल्हाध्यक्ष शंकरराव घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कार्याध्यक्ष राव यांनी सवतासुभा उभा करून समांतर कामकाज सुरु केल्याने त्यांना निलंबित करण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. अंतिम निर्णय समितीचे अध्यक्ष डॉ. आढाव यांच्यावर सोपवण्यात आला आहे. रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाच्या घोषणेची पूर्तता करावी, भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी, छोट्या शहरांत होणारी इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती थांबवावी, विद्यार्थी वाहतुकीस परवानगी आदी प्रलंबित मागण्यांसाठी 18 जुलै रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.