आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aware Of The Existence Of Social Protection Rules, Sonali Kulkarni

सामाजिक जाणीव जपणे हा जीवनधर्मच, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - काॅम्रेडगोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, अरुणा रॉय अण्णा हजारे यासारख्या विचारज्योतींचा हात धरून ठेवत आपण आपली सामाजिक जाणीव निष्ठेने जपण्याची आवश्यकता आहे. सामाजिक जाणीव जपणे हा जीवनधर्मच आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने केले.

स्नेहालयात आयोजित आठव्या सांगड कार्यकर्ता महासंमेलनाच्या समाराेपप्रसंगी सोनाली बोलत होती. अभिनेत्री वीणा जामगावकरने तिला विविध विषयांवर बोलते केले. सोनाली म्हणाली, डॉ. दाभोलकर यांच्या कार्याचा मोठा पगडा माझ्यावर आहे. मुक्ता दाभोलकर माझ्या वर्गात शिकत होती. त्यामुळे डॉ. दाभोलकरांचे काम मला जवळून अनुभवता आले. अमृता पटवर्धन ही माझी मैत्रिण मेधा पाटकरांची पूर्णवेळ कार्यकर्ती होती. तिच्या माध्यमातून पाटकर यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल अधिक माहिती घेता आली, त्यांना प्रत्यक्ष भेटता आले. अशी माणसे आपल्या आयुष्यात खूप काही शिकवून जातात. आपण जन्मत:च कुठल्या क्षेत्रात कधी काही करायचे ठरवून येत नाही. मात्र, आपल्या बाजूचे वातावरण पोषक असेल, तर व्यक्ती घडत जाते. मी आतापर्यंत १०० चित्रपट, ५० जाहिराती ५० पेक्षा अधिक टीव्ही कार्यक्रम केले अाहेत. मात्र, "दोघी' "डॉ. प्रकाशबाबा आमटे' यासारखे चित्रपट खूप काही शिकवून गेले. यासारखे चित्रपट डॉ. जब्बार पटेल, सुमित्रा भावे यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शकांच्या भेटीतून माझी समज वाढत गेली. "सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम' या रिंगणनाट्याचा प्रयोग मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये व्हावा, तसेच हे नाटक सर्वदूर जावे यासाठी मदत करू शकल्याचे समाधान मला आहे. भविष्यातही चांगल्या लोकांसमवेत काम करायला नक्की आवडेल, असे तिने सांगितले.

नशीब आपणच घडवतो
चित्रपटसृष्टीतनाटक, सिनेमा, मालिकांचे मुहूर्त, पूजापाठ, नारळ वाढवणे, नाव बदलणे, नावाचे स्पेलिंग बदलणे अशा बाबी केल्या जातात. या बाबी करण्यावर काही लोकांचा अधिक भर असतो. माझ्या चित्रपटांचे मुहूर्त मात्र फार कमी होतात. कारण आपले नशीब आपणच घडवायला हवे या गोष्टीवर माझा विश्वास आहे, असे सोनालीने यावेळी सांगितले.