आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडावरील अप्रतिम कॅलिग्राफीचे घडेल इथे दर्शन...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सोळाव्या शतकात नगरमध्ये तयार झालेली सर्वात सुंदर वास्तू म्हणजे दमडी मशीद! येत्या रविवारी (१६ नोव्हेंबर) सकाळी साडेआठ वाजता दमडी मशीद आणि या परिसरात असलेले बोअर युद्धाचे स्मारक पाहण्याची संधी नगरकरांना "दिव्य मराठी सिटी वॉक'मध्ये मिळू शकेल.
बुऱ्हाणनगरकडे रस्त्यावर असलेल्या या मशिदीवर अप्रतिम कॅलिग्राफी पहायला मिळते. या मशिदीचे मिनार, तसेच भिंतीवर कमळाची देखणी फुले कोरण्यात आली आहेत. किल्ल्याचे बांधकाम चालू असताना तेथे काम करणाऱ्या मजुरांनी फकिराला दिलेल्या दमड्या साठवून त्या पैशांतून ही मशीद बांधण्यात आली.
या वास्तूच्या मागे असलेल्या ख्रिश्चन कब्रस्तानात बोअर युद्ध, तसेच पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात लढलेल्या सैनिकांच्या व लष्करी अधिकाऱ्यांच्या कबरी आहेत. तेथेही भेट देण्यात येईल. किल्ल्यातील प्रदर्शनासाठी ज्यांनी महायुद्धासंबंधी बहुमोल माहिती गोळा केली, ते डॉ. शशी धर्माधिकारी यावेळी उपस्थितांशी संवाद साधतील.
भेटूया रविवारी सकाळी साडेआठला...
येत्या रविवारी सकाळी साडेआठ वाजता सर्वांनी बुऱ्हाणनगर रस्त्यावरील दमडी मशिदीजवळ जमायचे आहे. दहापर्यंत सिटी वॉक चालेल. येताना पिण्याचे पाणी व उन्हासाठी कॅप आणावी. अधिक माहिती व सहभागासाठी भूषण देशमुख, मोबाइल ९८८१३३७७७५ यांच्याशी १५ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.