आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कान्हूरपठारचा वैशिष्ट्यपूर्ण पोळा उत्साहात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यात प्रसिद्ध असलेल्या कान्हूरपठार (ता. पारनेर) येथील पोळा सण सोमवारी नर्तिकांची बारी, पारंपरिक वाद्ये, डीजे, ढोलताशे, शोभेच्या दारुची आतषबाजी करत उत्साहात साजरा झाला. कान्हूरपठार हे गाव कृषिप्रधान असल्याने या गावात पोळा हा एकमेव सण साजरा केला जातो. यावर्षी सुमारे एक हजारांवर बैल या सणात सहभागी झाले होते.
दुपारी शेतकऱ्यांनी बँड, डीजे, ढोलताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक काढून मुख्य चौकात आणले. सायंकाळी पाचच्या सुमारास माधव कृष्णाजी ठुबे यांच्या बैलांची पूजा करण्यात आली. मानाच्या बैलांची पूजा झाल्यानंतर पोळा सण रात्री उशिरापर्यंत साजरा करण्यात आला. या सणाच्या यशस्विततेसाठी सरपंच संगीता सोनावळे, उपसरपंच गोकुळ काकडे, यात्रा समितीचे द. मा. ठुबे, उस्मान इनामदार, अशोक नवले, अण्णासाहेब सोनवणे, सुभाष पाटील, बी. एन. ठुबे आदींनी परिश्रम घेतले.
मंगळवारी (२६ ऑगस्ट) गौराईची यात्रा आहे. या यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या हगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे. हगाम्यासाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

हा सण पाहण्यासाठी जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील लोकही येतात. या सणाला गालबोट लागू नये, यासाठी गावात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हेगारीलाही आळा बसेल, असे सरपंच संगीता सोनावळे यांनी सांिगतले. नगर तालुक्यातील जखणगाव येथेही पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.