नगर- आयुर्वेदिक औषधांच्या निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शारंगधर फार्माने शेतीक्षेत्रात एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम सुरू करताना शेतक-यांचा फायदा हा उद्देशही शारंगधरने नजरेसमोर ठेवला आहे. शारंगधरतर्फे मोफत बियाणे, मार्गदर्शन आणि रास्त भावाने उत्पादन खरेदीची हमी देण्यात येते, असे शारंगधरचे संचालक किरण अभ्यंकर, गिरीश प्रधान यांनी सांगितले.
एक वर्षांपूर्वी ही योजना ठरवल्यावर अभ्यंकर यांच्या हस्ते भोर (जि. पुणे) येथील प्रगतिशील शेतकरी ग्यानबा मारुती गोरड यांच्या शेतात या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. अश्वगंधा या वनस्पतीचे बियाणे गोरड यांना शारंगधर कंपनीतर्फे देण्यात आले. तसेच उत्पादनावश्यक योग्य ते मार्गदर्शनही उपलब्ध केले. त्याच प्रकारे जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी विशाल चोबे यांचे शेतातही अश्वगंधा तयार करण्याचे ठरले. या दोन्ही शेतकऱ्यांना खरेदीची आिण रसभावाची हमी देण्यात आली. अश्वगंधा वनस्पतींच्या उत्पादनाच्या या प्राथमिक प्रयोगानंतर शतावरी, आवळकठी, शंखपुष्पी, गुडमार्क, सुंठ, ब्राह्मी आदी अनेक वनस्पतींच्या उत्पादनाकरिताही शारंगधर हे उपक्रम राबवणार आहे.