आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B.J Kolse News In Marathi, MNS, Anita Dighe, Divya Marathi

बी. जी. कोळसे यांना मनसे पाठिंबा देणार,महिला आघाडीच्या अनिता दिघे यांचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड - माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट संकेत मनसे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अँड. अनिता दिघे यांनी मंगळवारी दिले.लोकशासन आंदोलनाचे नेते व अपक्ष उमेदवार कोळसे यांच्या प्रचारासाठी अँड. दिघे जामखेडला आल्या होत्या. कोळसे व अँड. दिघे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात अँड. दिघे यांनी मनसे कोळसे यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, कोळसे आमचे गुरू आहेत. त्यांच्या विचारांना मानणारे आम्ही आहोत. त्यांना संधी मिळाल्यास मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.

कोळसे म्हणाले, काँग्रेस सरकारवर आता भरवसा राहिलेला नाही. सरकारची बारामती, इंदापूर, अकलूज सोडून इतरांना पाणी देण्याची इच्छाच नाही. जामखेडला 6 टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. कृष्णा खोरे लवादामुळे हक्काचे 81 टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे. या पाण्यामधून जामखेडला पाणी मिळाले पाहिजे. पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहिजे. त्यासाठी जनशक्ती उभी करून पाण्याचा प्रo्न सोडवण्याचा आपला प्रयत्न राहील. मी निवडून येवो अथवा न येवो, जामखेडला मी वार्‍यावर सोडणार नाही, असे कोळसे म्हणाले.