आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Baban Pachpute And Shiwajirao Nagvade Disput For Maldhok Matter

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलगीतुरा: पाचपुते-नागवडे यांच्यात ‘माळढोक’प्रश्नी जुंपली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- माळढोक अभयारण्याच्या आरक्षणावरून तालुक्यात पालकमंत्री बबनराव पाचपुते व त्यांचे पारंपरिक विरोधक माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. उभय नेत्यांनी परस्परांना लक्ष्य केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
माळढोक पक्षी अभयारण्यातील खासगी क्षेत्रांचे आरक्षण करण्यासंदर्भात सध्या जिल्हाधिकार्‍यांमार्फत कार्यवाही सुरू आहे. र्शीगोंदा व कर्जत तालुक्यातील खासगी जमिनींची खरेदी-विक्री प्रांताधिकारी संजीव कोकडे यांनी दुय्यम उपनिबंधकांना पत्र देऊन थांबवली आहे. या आरक्षणावर हरकतींची अंतिम मुदत 11 सप्टेंबर 2012 पर्यंत आहे. ही प्रक्रिया सुरू असताना शेतकरी मात्र पूर्ण हतबल झाला आहे. दुसरीकडे राजकीय नेते परस्परांवर चिखलफेक करताना दिसत आहेत.
माळढोक अभयारण्याची सर्वात पहिली अधिसूचना सन 1979 मध्ये झाली. त्याच्या हद्दी आतापर्यंत निश्चित नव्हत्या. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित होते. आता 33 वर्षांनंतर माळढोक अभयारण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याने हे दुखणे कोणामुळे व कशामुळे वाढले यावरून पाचपुते व नागवडे यांच्यातील कलगीतुरा रंगात आला आहे. पाचपुतेंकडे वनमंत्रिपद असताना त्यांनीच हे दुखणे तालुक्याच्या मागे लावल्याचा आरोप नागवडेंनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना पाचपुते यांनी सन 1979 मध्ये माळढोकची पहिल्यांदा अधिसूचना निघाली, त्या वेळी नागवडे हेच तालुक्याचे आमदार होते. अभयारण्याचे क्षेत्र कमी करण्यासाठी त्यांनी काय केले, हे आधी सांगा; नाही तर या विषयावर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगितले.
आरक्षणातून पाचपुते यांचा खासगी साखर कारखाना व शैक्षणिक संस्था कशा सुटल्या, असा प्रo्न नागवडे यांनी उपस्थित केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना पाचपुते यांनी एका निवडणुकीइतका खर्च आपण माळढोकच्या न्यायालयीन लढाईसाठी केला. त्यामुळे मूळ अभयारण्यातील 86 टक्के क्षेत्र कमी होऊन आता फक्त 14 टक्के क्षेत्र उरले. तेही हरकतींद्वारे कमी केले जाईल. या 86 टक्क्यांत फक्त माझे क्षेत्र आहे का, याची नागवडे यांनी माहिती घ्यावी, असा टोला मारला.
माळढोक अभयारण्याचा मुद्दा सत्तेच्या साठमारीतील एक प्रमुख हत्यार म्हणून पुढे येत आहे. मात्र, या आरोप-प्रत्यारोपात मूळ प्रo्नाला बगल मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा प्रo्न पाचपुते किंवा नागवडे यांच्याशी निगडीत नाही. यातून शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी उभय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे; अन्यथा या कलगीतुर्‍यात फक्त राजकीय खेळ होईल.