आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babanrao Gholap News In Marathi, Anna Hazare, Mahayuti, Divya Marathi

अण्णांबरोबरचा वाद 15 वर्षांपूर्वीच संपला, महायुतीचे उमेदवार बबनराव घोलप यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार मिळवून दिल्याने ते मोठे आहेत. अण्णा व माझ्यातील वाद पंधरा वर्षांपूर्वीच संपला आहे. आमच्यात कोणतेही वैर नाही, असे शिर्डीतील महायुतीचे उमेदवार बबनराव घोलप यांनी रविवारी कोपरगाव येथे सांगितले.


गारपीटग्रस्त भागाचा दौरा झाल्यानंतर घोलप यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी आमदार अशोक काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे उपस्थित होते. घोलप म्हणाले, हजारे आणि माझ्यात कोणतेही वैर राहिलेले नाही. ते मोठे आहेत. मी साधा समाजसेवक आहे. ते त्यांचे काम करत आहेत, मी माझे काम करतो आहे.


गारपिटीमुळे कोपरगाव तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे पंचनामे झाले आहेत. मात्र, गारपिटीत नुकसान झालेल्या घरांचे, वीटभट्टय़ांचे, तसेच गोठय़ांचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकार्‍यांना नाहीत. काही ठिकाणी अद्याप पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. शेतकर्‍यांना मदत न करण्यासाठीच आता शासन पंचनाम्यातच आणेवारीची अट घालत आहे, असे घोलप यांनी सांगितले.