आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगमनेर - गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही गद्दार आणि उपर्यांच्याच पालख्या उचलल्या. हे गद्दार आणि उपरे त्यांच्या पूर्वीच्याच कळपात सामील झाले. पक्षासाठी यातना भोगल्या, अंगावर अनेक केसेस घेतल्या. आता आम्हाला पक्षानेच निष्ठावंत उमेदवार दिल्याने गद्दाराचा पराभव निश्चित आहे, अशा शब्दांत शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.महायुतीचे उमेदवार बबनराव घोलप यांच्या उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकार्यांचा मेळावा झाला. या वेळी पदाधिकार्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे व शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख अँड. दिलीप साळगट, कैलास वाकचौरे, शहरप्रमुख अमर कतारी व संजय फड, अप्पा केसेकर, रावसाहेब गुंजाळ, शरद थोरात, भाजपचे राधावल्लभ कासट, अँड. श्रीराम गणपुले आदी या वेळी उपस्थित होते. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेला काँग्रेस प्रवेश म्हणजे त्यांना बुडत्या जहाजात बसण्याची उपरती झाल्याची टीका करण्यात आली. साईबाबांची शपथ घेऊन त्यांचीही फसवणूक करणार्या वाकचौरे यांनी गद्दारी केली. आता या गद्दाराला गावात फिरू दिले जाणार नाही. वाकचौरे जरी गेले तरी आणखीही काही कावळे आमच्यात आहेत. याची पक्षाने दखल घ्यायला हवी. शिवसेनेत स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत. या शिलेदारांना मानाचे स्थान मिळायलाच हवे. केंद्रात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपसातील मतभेद दूर ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सूत्रसंचालन तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे यांनी केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.