आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babanrao Gholap News In Marathi, Shiv Sena, Shird Lok Sabha Seat

सेनेशी गद्दारी करणा-यांना धडा शिकवणार ,शिर्डीत दाखल होताच घोलप यांचे वक्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - मंत्री असताना नाशिक जिल्ह्यात पाच धरणे बांधून अहमदनगर जिल्ह्याला पाणी दिले. माझा येथे सातबारा आहे, त्यामुळे मी परका नाही. शिवसेनेशी व साईबाबांशी गद्दारी करणा-यांना धडा शिकविण्यासाठी आलो असल्याचे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार, आमदार बबनराव घोलप यांनी केले.


उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घोलप सोमवारी सायंकाळी 6 वाजता शिर्डी येथे आले असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्या वेळी शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुहास सामंत, आमदार अनिल राठोड, उपनेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, रिपाइंचे नेते विजय वाक् चौरे आदींसह नगर जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते. गेल्या वेळी भाऊसाहेब वाक्चौरेंना शिवसेनेची उमेदवारी व युतीच्या राजवटीत राधाकृष्ण विखे यांना कृषिमंत्रीपद माझ्यामुळेच मिळाले होते, असे सांगून घोलप पुढे म्हणाले, या दोघांनीही शिवसेनेशी गद्दारी केली. या गोष्टींचे शल्य मनात आहे. 16 वर्षांचा असताना मी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसैनिक व मित्रपक्षांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन घोलप यांनी केले.