आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते भाजपच्या संपर्कात?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते विधासभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या मन:स्थितीत असून ते भाजपच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी बबनरावांचे पुत्र विक्रमसिंह अहमदनगर मतदारसंघासाठी उत्सुक होते. मात्र, अजित पवार यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत थेट राजीव राजळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यामुळे नाराज पाचपुते त्या निवडणुकीत काहीसे अलिप्त राहिल्याची टीका होत आहे. पाचपुते यांचे आदिवासी विकासमंत्रिपद अचानक काढून घेण्यात आले होते. हे मंत्रिपद मधुकर पिचड यांना देऊन पाचपुतेंच्या जखमेवर मीठ चोळले गेले.

साखर कारखान्यांचीही कोंडी
लोकसभा निवडणुकीआधीच पाचपुते यांचे पंख कापण्यास सुरुवात झाली होती. त्यांचे साईकृपा 1 व 2 असे दोन साखर कारखाने आहेत. त्यांना ऊस मिळू नये अशी व्यवस्था अजित पवारांनी केल्याचे सांगितले जाते. र्शीगोंदे तालुक्याला लागूनच पवारांचे अंबालिका व दौंड शुगर असे दोन कारखाने आहेत. त्यांनी पाचपुतेंच्या कारखान्यांचा ऊस पळवला. तेव्हा समोर सर्व दिसत असतानाही हताशपणे पाहत राहण्यापलीकडे पाचपुतेंकडे पर्याय नव्हता.