आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babanrao Pachpute News In Marathi, Nationalist Congress, Divya Marathi

पाचपुते यांना भाजपात घ्याल, तर वेगळा विचार; निष्ठावंतांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राष्ट्रवादीला रामराम ठोकणारे माजी आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपमधील पदाधिका-यांनी पाचपुतेंच्या प्रवेशाला विरोध केल्याने त्यांच्या भाजप प्रवेशावर आता अनिश्चिततेचे सावट आहे.
दरम्यान, पाचपुते यांच्या भाजपमधील प्रवेशाबाबत अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

अजित पवार यांच्यासह आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पाचपुतेंनी राष्‍ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. ते भाजपमध्ये प्रवेश घेणार अशी चर्चा आहे. मात्र, भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाचपुते यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध केला आहे. श्रीगोंद्यात रविवारी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक झाली. पाचपुते यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देऊ नये; अन्यथा निष्ठावंत वेगळा विचार करतील, असा इशारा त्यात देण्यात आला. त्यामुळे पाचपुते आता ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. भाजप प्रवेश रद्द झाल्यास ते विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवतील, असा अंदाज आहे.