आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babasaheb Purandare In Nagar For Book Publishing

समाजात चांगली मूल्ये रुजवण्यासाठी प्रतिभावंतांनी मुक्त मनाने लिहावे - बाबासाहेब पुरंदरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लेखकांनी आपल्या प्रतिभेचा वापर समाजजागृतीसाठी केला पाहिजे. समाजात चांगली मूल्ये रूजवण्यासाठी प्रतिभावंत लेखकांनी मुक्त मनाने लिखाण करायला हवे, असे आवाहन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. नगर येथील साहित्यिक सदानंद भणगे लिखित "ओविले फुले मोकळी' या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुरंदरे त्यांच्या हस्ते पुण्यात झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रकाशन सोहळ्याला प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, कादंबरीकार उमेश सणस, पत्रकार विनायक लिमये, चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील आदी उपस्थित होते. भणगे यांचे हे पंचविसावे पुस्तक आहे.

यावेळी गाडगीळ म्हणाले, ग्रामीण भागातील लेखकांना खूप काही सांगायचे असते, तसेच लिखाण करायचे असते. पण प्रकाशक उत्सुक नसतात. त्यामुळे नवोदित लेखकांना स्थान मिळणे हे कौतुकास्पद आहे.

घनश्याम पाटील यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन माधव गीर यांनी केले. शुभांगी गिरमे यांनी आभार मानले. भणगे यांच्या पुस्तकाबरोबरच संजय वाघ, प्रभाकर तुंगार, विनोद पंचभाई,

हणमंत कुऱ्हाडे, संदीपान पवार, प्रभाकर चव्हाण, शांताराम हिवराळे, चंद्रलेखा बेलसरे यांची विविध विषयांवरील पुस्तके यावेळी प्रकाशित झाली. भणगे यांनी सर्व लेखकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो - नगर येथील साहित्यिक सदानंद भणगे यांच्या "ओविले फुले मोकळी' या पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पुण्यात झाले. यावेळी सुधीर गाडगीळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.