आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाभुळगाव प्रकरण: मुख्य आरोपी केतन लाढाणे फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत - बाभुळगाव खालसा येथील अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीमुळे तिच्या वडिलांना जीव गमवावा लागला. यातील मुख्य आरोपी केतन भाऊसाहेब लाढाणे फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. फिर्यादीच्या कुटुंबीयांचे जबाब घेण्यात आले आहेत. आरोपींच्या घरातील लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाने शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तालुक्यातील कोपर्डी प्रकरण अद्याप शांत झालेले नसताना भांबोरा त्यानंतर मिरजगाव येथील असे प्रकरण पुढे आले आहे. प्रत्येक वेळा अल्पवयीन मुलींंचे भविष्य खराब होईल म्हणून छेडछाडीची प्रकरणे पोलिसांपर्यंत जाऊ दिली जात नाहीत. एखादे प्रकरण गेले, तरी काही लोक मुलीच्या पालकांवर दबाव आणून तक्रार मागे घेण्यास भाग पाडतात. बाभुळगाव खालसा येथील प्रकरणात संबधित शाळेने शिक्षकांनी कठोर भूमिका घेऊन दोषींवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावातील काही नेत्यांनी हे प्रकरण मिटवल्याचे पुढे आले आहे. अशीच स्थिती राहिली, तर मुलींच्या शिक्षणाचा मार्ग बंद होण्याची भीती आहे.

मध्यस्थी करणाऱ्यांना सहआरोपी करा
काही नेते मध्यस्थाची भूमिका घेऊन छेडछेडीची प्रकरणे मिटवतात. या तथाकथित पुढाऱ्यांनाच सहआरोपी करण्याची मागणी होत आहे.
बातम्या आणखी आहेत...