आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूषित पाण्यामुळे शंभरजणांना कावीळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्रभाग २७ मधील आगरकर मळा, आनंदनगर, गजानन कॉलनी, स्मृती कॉलनी, शिवनेरी चौक, मल्हार चौक आदी भागात गेल्या काही दविसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सुमारे शंभर नागरिकांना काविळीची लागण झाली आहे. मनपा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. स्थानिक नगरसेवकांनी वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. आता उशिरा जाग्या झालेल्या प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
शहराच्या विविध भागात गेल्या दोन-तीन महनि्यांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. त्याबाबत दैनिक दिव्य मराठीने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द केले. काही दिवसांपूर्वीच उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या प्रभागात अळ्यायुक्त पाणी आढळून आले होते. त्याबाबत दिव्य मराठीने वृत्त प्रसिध्द करूनही निर्ढावलेल्या प्रशासनाने काहीच उपाययाेजना केल्या नाहीत. आता माजी महापौर शीला शिंदे यांच्या प्रभाग २७ मधील आगरकर मळा व इतर भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्याबाबत नगरसेवक अनिल शिंदे व नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु नरि्ढावलेल्या प्रशासनाने या तक्रारींची दखल घेतली नाही. परिणामी प्रभागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात जलजन्य आजारांची लागण झाली. सुमारे चारशे नागरिक कावीळ, टायफाईड, जुलाब, उलट्या या आजारांनी त्रस्त आहेत. त्यापैकी सुमारे शंभर नागरिकांना काविळीची लागण झाली. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी व आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दोन दविसांपूर्वी या भागाची पाहणी केली. दोन दविस पाणीपुरवठा बंद करून टाक्यांची स्वच्छता करणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, नागरिक आजारी का पडत आहेत, याची अर्धवट माहिती घेऊन डॉ. राजूरकर यांनी तात्पुरती मलमपट्टी केली असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
परिसरातील अंतर्गत पाइपलाइन फुटली का, ड्रेनेजचे पाणी पाइपलाइनमध्ये उतरले का, पाइपलाइन शेजारी ड्रेनेज चेंबरचे जॉइंट आहेत का, या बाबी तपासून पाहण्यासाठी परिसरातील संपूर्ण पाइपलाइनची पाहणी करणे आवश्यक आहे. सबस्टेशनवर फिल्टर मशीन सुस्थितीत आहे की नाही हे पहावे, पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करावी, तसेच तोपर्यंत रोगप्रतिबंधक उपाययोजना सुरू कराव्या, अशी मागणी मनसेचे शहर सचवि नितीन भुतारे यांनी केली आहे. दूषित पाणीपुरवठा त्वरित न थांबल्यास त्याच पाण्याने मनपा अधिकाऱ्यांना अंघोळ घालण्यात येईल, असा इशाराही भुतारे यांनी दिला आहे.
मनपातर्फे फिरता दवाखाना
जलजन्य आजाराची अनेकांना लागण झाल्याने मनपा प्रशासनाने प्रभागातील विविध भागात फरिता दवाखाना सुरू केला. पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता मोहीम सुरू करून घरोघरी क्लोरनि पावडरचे वाटप करण्यात येत आहे. काविळीची लागण होऊ नये, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी केले आहे.
सर्वत्र उपाययोजना हव्यात...
शहरातील मुकुंंदनगर, केडगाव, सावेडीचा काही भाग, सिवि्हल हडको आदी भागांत सध्या दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने केवळ जलजन्य आजाराची लागण झालेल्या भागातच उपाययोजना न करता त्या संपूर्ण शहरात कराव्यात. पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मनपाने सर्वत्र उपाययोजना राबवाव्या.
उपाययोजना सुरू
दूषित पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रभागाची पाहणी केली. दोन दविस पाणीपुरवठा बंद ठेवून टाक्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल, तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. आजारांची लागण थांबवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.”
अनिल शिंदे, नगरसेवक.