आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुजन क्रांती मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विविधमागण्यांसाठी बहुजन समाजाच्या वतीने सोमवारी (२४ ऑक्टोबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात असून, मोर्चाचा मार्ग निश्चित कण्यात आला आहे. बहुजन क्रांती मोर्चा हा मूकमोर्चा नाही. या मोर्चात घोषणा दिल्या जातील, अशी माहिती संयोजन समितीने दिली.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संयोजन समितीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी अशोक गायकवाड, प्रा.किसन चव्हाण, राजेंद्र दौंड, भीमराज आव्हाड, अनंत लोखंडे, अप्पासाहेब गायकवाड, संजय खामकर, पंडित वाघमारे, सुधारक रोहम, किशोर उमाप, बाळासाहेब आव्हाड, योगेश गुंजाळ, प्रा. जयंत गायकवाड, अजय भिंगारदिवे, दिनेश आंबेडकर, दीपक वाळे, सुरेश बनसोडे, अजय साळवे, नामदेव चांदणे, अंकुश मोहिते, भीमराव पगारे, आशिष गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

संयोजन समितीचे पदाधिकारी म्हणाले, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन जिल्हा प्रशासनाने संयोजन समितीबरोबर वेगवेगळ्या पातळीवर बैठका घेतल्या. आचारसंहिता असतानाही त्यांनी आम्हाला परवानगी दिली. मोर्चात विविध समाजांतील संघटना सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर अनेक संघटनांनीही मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मोर्चाची सुरुवात सोमवारी सकाळी ११ वाजता वाडिया पार्क येथील मैदानापासून होणार आहे. मोर्चाचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. वाडिया पार्क ते चांदणी चौक असा मोर्चा काढण्यात येणार आहे. वाडिया पार्क येथे दहा फुटी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. व्यासपीठावर निश्चित केलेल्या मान्यवरांची भाषणे होणार आहे. प्रारंभी कोपर्डी घटनेतील दुर्दैँवी मुलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. वाडिया पार्कमध्ये प्रवेशासाठी चार प्रवेशद्वारे खुले करण्यात येणार आहे. मोर्चा एकाच प्रवेशद्वारातून बाहेर पडणार आहे. मोर्चाच्या मध्यभागी महिला, वृध्द मुले असतील. वाडिया पार्क येथून हा मोर्चा निघाल्यानंतर माळीवाडा बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल.
त्यानंतर पुढे मोर्चा गेल्यानंतर तेथे महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. चांदणी चौकात मोर्चा आल्यानंतर तेथे उभारलेल्या व्यासपीठावर निवेदन संविधानाचे वाचन होईल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. मोर्चाच्या मार्गावर ड्रोन कॅमेरे ठेवण्यात येणार आहेत. मोर्चातून रुग्णवाहिका जावी यासाठी काही अंतर ठेवण्यात येईल. मोर्चात जिल्हाभरातून लोक सहभागी होणार असल्यामुळे वाहने लावण्यासाठी वाहनतळाची जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. शहरात येणाऱ्या आठ प्रमुख रस्त्यांच्या भागात ही वाहनतळे ठेवण्यात आली आहेत. आैरंगाबाद रस्त्याहून येणाऱ्या वाहनांसाठी जुने आरटीआे कार्यालय, मनमाड रोडहून येणाऱ्यांसाठी सारडा महाविद्यालय, प्रेमदान चौकातील गायकवाड हॉल, पाथर्डी, जामखेडहून येणाऱ्या वाहनांसाठी प्रियदर्शनी मैदान, भिंगार हायस्कूल, सोलापूर रस्त्याहून येणाऱ्यासाठी कोठी मैदान, पुणे-दौंडहूून सी. डी. देशमुख लॉ कॉलेज येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळावर प्रत्येकी ५०० स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी वडगावगुप्ता ते भिंगार अशी रॅली काढण्यात आली. शुक्रवारी भगवानगड ते मढी अशी रॅली काढण्यात आली आहे. मोर्चात मुले सहभागी होणार असल्याने ते हरवू नये, यासाठी लहान मुलांच्या खिशात नाव त्याचे कुटुंबीयांचा मोबाइल क्रमांक लिहिण्यात येणार आहे. या बहुजन क्रांती मोर्चात सुमारे पाच लाख लोक सहभागी होणार आहेत. मोर्चा चळवळीचा आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

मोर्चाला विविध संघटनांचा पाठिंबा
विविधमागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी (२४ ऑक्टोबर) मोर्चा काढण्यात येणार आहे. बहुजन क्रांती मोर्चाला बहुजन मुक्ती पार्टीने पाठिंबा दिला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ यांनी दिली. त्याचबरोबर जय भगवान महासंघ, बहुजन कर्मचारी सेवा संघ, जमाते-उलमा, मातंग एकता आंदोलन, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिच्चन, वाल्मिकी समाज, लहूजी सेना, मागासवर्गीय विधुत महामंडळ कर्मचारी संघटना यांच्यासह अन्य संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

लोकवर्गणीतून सहभाग
मोर्चाचेगावपातळीवर नियोजन केले आहे. या मोर्चात सर्व बहुजन संघटना सहभागी होत आहेत. न्याय्य हक्कांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहेत. लोकवर्गणी करून लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चा कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. आमच्या मोर्चात आम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशीही मागणी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...