आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुजनांचा आज एल्गार, वाडिया पार्क मैदान सज्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बहुजन क्रांती मोर्चातर्फे सोमवारी (२४ ऑक्टोबर) काढण्यात येणाऱ्या मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. मोर्चासाठी वाडिया पार्कचे मैदान सज्ज झाले अाहे. सकाळी ११ वाजता वाडिया पार्क मैदानावरून मोर्चा निघेल. सोलापूर रस्त्यावरील चांदणी चौकात निवेदन संविधानाचे वाचन होऊन मोर्चाचा समोराप होईल.
अॅट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, या कायद्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्वतंत्र योजना सुरू कराव्यात, महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा, कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, आेबीसींची जातवार जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, भटके विमुक्तांना अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे, एससी-एसटीमधील लोकांचा वापर करून अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून जे खोटे गुन्हे दाखल करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, आेबीसी आदिवासींच्या आरक्षणातील घुसखोरी थांबवावी, राखीव जागांमधील नोकरीतील अनुशेष तातडीने भरावा, आेबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, मुस्लिम समाजाला सच्चर कमिशन लागू करून अारक्षण द्यावे, बहुजन समाजातील राजकीय नेत्यांवरील राजकीय आकसापोटी केलेली कारवाई थांबवावी, भूमिहीनांना शासकीय जमिनींचे वाटप करावे, ख्रिश्चन जनसमुदाय चर्चवरील हल्ले थांबवावेत, शेतीमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मोर्चाची तयारी रविवारी पूर्ण झाली. मोर्चासाठी नगर जिल्ह्यासह पुणे, आैरंगाबाद, मुंबई, सोलापूर येथून लोक येणार आहेत. शहराबाहेरून येणाऱ्यांसाठी स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळपासून लोक येणार आहेत. हा मूक मोर्चा नसल्याने वाडिया पार्क येथे उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर भाषणे होतील. चांदणी चौकात उभारलेल्या व्यासपीठावर मागण्यांचे निवेदन संविधनाचे वाचन होऊन मोर्चाचा समोराप होईल. मोर्चासाठी वाडिया पार्क मैदानावर दहा फूट उंचीचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. व्यासपीठाच्या बाजूला भोंगे लावण्यात आले आहेत. चांदणी चौकातही व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी झेंडे लावण्यात आले आहेत.

बहुजन क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या आदेशानुसार वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मोर्चाला अडथळा येऊ नये, तसेच वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा बदल करण्यात आला आहे. शेवगाव, पाथर्डीमार्गाने येणारी वाहतूक बुऱ्हाणनगर रस्त्याने शेंडी बाह्यवळण रस्ता, एमआयडीसी बाह्यवळण ते सनफार्मा चौक, पत्रकार चौक, तारकपूरमार्गे वळवण्यात आली आहे. जामखेडहून येणारी वाहतूक भिंगारनालामार्गे सोलापूर रस्ता, अरणगाव बाह्यवळण, केडगाव बाह्यवळण, कल्याण रस्ता बाह्यवळण, निंबळकमार्गे, सनफार्मा चौक, पत्रकार चौक, तारकपूरमार्गे वळवण्यात आली आहे. सोलापूर रस्त्याने येणारी वाहतूक वाळुंज बाह्यवळणमार्गे अरणगाव बाह्यवळण, केडगाव बाह्यवळण, कल्याण रस्ता, निंबळक रस्तामार्गे सनफार्मा चौक, पत्रकार चौक, तारकपूरमार्गे वळवण्यात आली आहे. दौंड, श्रीगोंदे रस्त्याने वाहतूक अरणगाव बाह्यवळण, केडगाव बाह्यवळण, कल्याण रस्ता, निंबळक, पत्रकार चौक, तारकपूरमार्गे वळवण्यात आली आहे. पुणे रस्त्याने येणारी वाहतूक केडगाव बाह्यवळण, कल्याण रस्ता, निबंळक रोड, सनफार्मा मार्गे तारकपूर मार्ग वळवण्यात आली आहे. आळेफाटा कल्याण मार्गे येणारी वाहतूक कल्याण रस्ता, निबंळक, सनफार्मा चौकमार्गे तारकपूरकडे वळवण्यात आली. मनमाडकडून येणारी वाहतूक विळद बाह्यवळणमार्गे एमआयडीसी ते तारकपूरकडे वळवण्यात आली. आैरंगाबादहून येणारी वाहतूक शेंडी बाह्यवळण रस्ता, तारकपूरकडे वळवण्यात आली आहे.

सफाई कामगार संघटनेचा पाठिंबा
दिल्ली येथील अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेने बहुजन क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष घनराज चावरिया यांनी रविवारी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी अठरा पगड दलित, अल्पसंख्याक समाजावर होणारा अन्याय अत्याचार रोखण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला आमच्या संघटनेचा पाठिंबा राहील.
बातम्या आणखी आहेत...