आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शब्दगंध'ने बहुजनांना लिहिते केले - घुले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - फुले,शाहू, आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या बहुजन समाजातील अनेक माणसांना लिहिते करण्याचे काम शब्दगंध साहित्यिक परिषदेने केले, असे प्रतिपादन हमाल पंचायतचे अध्यक्ष शंकरराव घुले यांनी केले.

शब्दगंध साहित्यिक परिषदेतर्फे हमाल पंचायतचे कार्यकर्ते आनंदा साळवे यांच्या "डोंगर कड्याच्या वाटा' या काव्य संग्रहाचे प्रकाशन घुले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मराठी साहित्य परिषदेच्या प्रा. मेधा काळे, बाबा आरगडे, प्रा. डॉ. शंकर चव्हाण, सुभाष लांडे, शब्दगंधचे ज्ञानदेव पांडुळे, लक्ष्मणराव वाडेकर, चित्रपट दिग्दर्शक संजय पाटील, कवयित्री रिता राठोड आदी यावेळी उपस्थित होते.

घुले म्हणाले, ज्यांनी आपल्या जीवनाच्या वाटचालीत दु:ख, यातना, वेदना अनुभवल्या त्याच वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या, अशा वास्तववादी लेखक कवींचेच साहित्य सर्वसामान्य माणसांना भिडते तेच खरे साहित्य होय.

काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर कवी संमेलन झाले. यात स्वाती ठुबे, दिगंबर गौघडी, मनीषा पटेकर, श्रध्दा साळवे, बबन आढाव, चंद्रकांत बेलसरे, रंगनाथ राळेभात, वैष्णवी बोरुडे, प्रांजली पटेकर, प्रा. मेधा काळे रिता राठोड यांनी कविता सादर केल्या. प्रास्ताविक सुनील गोसावी यांनी केले.

'शब्दगंध'ने जोडले साहित्याशी नाते
हमालपंचायतने आम्हाला जगण्याचा मार्ग दाखवला, तर 'शब्दगंध'ने साहित्याशी आमचे नाते जोडले. चांगल्या व्यक्ती चांगल्या विचारांमु‌ळे मी घडलो. दु:ख, दारिद्र्य भोगले, कष्ट केले. मात्र, प्रामाणिकपणा सोडला नाही, म्हणूनच आज एक कष्टकरी माणूस साहित्यिकांच्या पंक्तीत बसू शकला, असे कवी आनंद काळे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...