नगर- श्रमिकनगर येथील श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेच्या एकविसाव्या ब्रह्मोत्सवास शनिवारपासून (2 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. 6 ऑगस्टपर्यंत चालणा-या या ब्रह्मोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी सात वाजता कावड प्रस्थान, दुपारी चार वाजता नल्ला स्वामी यांचे प्रवचन, सायंकाळी सहा ते सातपर्यंत श्रमिक बालाजी महिला मंडळाचा हरिपाठ व भजन, रात्री नऊ ते अकरा माळवदे महाराजांचे कीर्तन असे कार्यक्रम होतील. रविवारी सकाळी सहा ते आठदरम्यान बालाजी अभिषेक होईल. सायंकाळी चार वाजता कावड आगमन व सत्कार, पाच वाजता क्षौर अर्पण, सहा ते सात हरिपाठ, सात ते साडेसात संध्या आरती व रात्री आठ वाजता विजया पंडित यांचे कीर्तन होईल.
सोमवारी पहाटे साडेपाच वाजता दीप आराधना होणार आहे. पावणेसहा वाजता ध्वजारोहण, सकाळी सात ते आठ विष्णू सहस्त्रनाम, आठ वाजता कलश स्थापना व षडविनायक पूजन, पुण्याह वाचन होईल. अकरा वाजता मार्कंडेय मंदिर गांधी मैदानापासून बालाजी उत्सव मूर्तीची मिरवणूक निघेल. मंगळवारी पहाटे साडेपाच ते साडेसहा सुप्रभातम् व मंगलासम, साडेसहा ते साडेआठ रुद्राभिषेक, नऊ ते बारा होमहवन, दुपारी बारा वाजता आरती, साडेबारा ते तीनपर्यंत हळदी समारंभ व चार ते सहा होमहवन होणार आहे. बुधवारी पहाटे साडेपाच ते साडेसहा सुप्रभातम्, साडेसहाला जलघटाभिषेकम, नऊ वाजता सत्यनारायण महापूजा, दहा वाजता होमहवन, अकरा वाजता पालखी मिरवणूक, बारा वाजता होमहवन व पूर्णाहुती, दुपारी 1.18 वाजता श्रीव्यंकटेश वरला कल्याणम् ( लग्न), 1.25 वाजता सामुदायिक विवाह, 1.45 वाजता महाआरती व दोन वाजता महाप्रसादाचे आयोजन केल्याची माहिती उत्सव समितीचे सल्लागार धनंजय जाधव यांनी दिली. मंदिराभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ब्रह्मोत्सवास पंधरा हजार भाविक उपस्थित राहतील. उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यकारी मंडळाचे अध्यश्र विनोद म्याना, रमाकांत गाडे, त्रिलेश येनगंदुल, देविदास संभार, संजय बाले, चंद्रकांत दुलम, किसन बोमादंडी, धनंजय जाधव, आसाराम कावरे कार्यरत आहेत.