आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल न्यायदानातील सुधारणांसाठी सरकार गंभीर : बाळासाहेब थोरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महसूल न्यायदानातील अपील प्रकरणे दिवाणी व जिल्हा न्यायालयांकडे वर्ग करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असून सर्व बाबींची चिकित्सा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

महसूल न्यायदानातील भ्रष्टाचार, वशिलेबाजी, पुढारी व मंत्र्यांचा हस्तक्षेप दूर करण्यासाठी संबंधित अपिले दिवाणी व जिल्हा न्यायालयांकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी भेटण्यास आलेल्या वकिलांशी थोरात बोलत होते. नगर शहर वकील संघाच्या महसूल सुधार न्यायदान अभ्यास समितीचा अहवाल थोरात यांना देण्यात आला. अँड. नरेश गुगळे, अँड. निशांत देशमुख, अँड. विठ्ठल गुंड, अँड. महेश काबरा, अँड. कारभारी गवळी आदी या वेळी उपस्थित होते.

न्यायपालिका व कार्यकारी मंडळाचे कामकाज विभक्त करण्याचा भाग म्हणून घटनेच्या कलम 50 मधील आदेशाची अंमलबजावणी करण्यास सरकार बांधील आहे. महसूल न्यायदान प्रक्रियेत बदल करण्यासाठी संबंधित सर्र्वांशी चर्चा करण्याचे आश्वासन मंत्री थोरात यांनी दिले.