आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोरात यांच्यावर शाई फेकणाऱ्याकडे गुप्ती, हासेविरुद्ध गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शाई फेकणाऱ्या भाऊसाहेब हासे याच्याविरोधात शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्याच्यावर नगरच्या सवि्हलि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हासे याने शनिवारी थोरात यांच्यावर शाई फेकली होती. यासंदर्भात त्यांचे अंगरक्षक रमेश काळू शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राजापूर येथे फलकाचे अनावरण करून मंत्री थोरात गाडीत बसत असताना हासे थोरात यांच्या दशिेने धावत आला. त्याने पाठीमागे हात घालून लाकडी रुळासारखी वस्तू काढण्याचा प्रयत्न करताना मी व सहायक फौजदार पारधी यांनी त्याला पकडले. गडबडीत ती वस्तू खाली पडली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या हासेला लोकांनी पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर त्याला गुप्तीसह आम्ही ताब्यात घेऊन एस्कॉर्टच्या गाडीतून पोलिस ठाण्यात आणले.

दरम्यान, त्याच्या मोबाइलवर आलेला फोन उचलला असता समोरील व्यक्तीने काम झाले का, असे विचारले. समोरून माझा आवाज ऐकल्यानंतर त्याने फोन बंद केला. थोरात यांना अपाय करण्याच्या उद्देशाने गुप्ती जवळ बाळगणाऱ्या हासे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अंगरक्षकाला सापडलेली गुप्ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हासेच्या मोबाइलवरील कॉल डिटेल्स तपासले जात आहेत.