आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएएमएस डॉक्टरांना शासनाकडून दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आयुर्वेदा बरोबर आधुनिक औषधचिकित्सा वापरण्यास परवानगी देण्याच्या शासनाच्या निर्णयाचे वैद्यकीय विकास मंचाने स्वागत केले, अशी माहिती डॉ. राजा ठाकूर डॉ. महेश मुळे यांनी रविवारी दिली.

बीएएमएस डॉक्टरांना आधुनिक औषधचिकित्सेस परवानगी देणार्‍या महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक कायदा १९६१ मधील सुधारणा विधिमंडळात यापूर्वीच करण्यात आली होती. यासंदर्भात आता अधिसूचना निघाली आहे. त्यामुळे बीएएमएस डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण शहरी भागात ८० हजारांपेक्षा अधिक बीएएमएस डॉक्टर सेवा देत आहेत. त्यांचा अभ्यासक्रम प्रशिक्षणात आधुनिक औषधचिकित्सेचा समावेश आहे. आता व्यवसायातही आधुनिक औषधचिकित्सेचा वापर करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यासंदर्भात वैद्यकीय विकास मंचातर्फे पाठपुरावा करण्यात आला. या निर्णयाचे असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट आयुर्वेद मेडिकल कॉलेज, आयुर्वेद व्यासपीठ, आरोग्य भारती, अनुदानित आयुर्वेद महाविद्यालय व्यवस्थापन प्राचार्य संघटना, बीजीए आदींनी स्वागत केले आहे.